___ ___

संवेदना फौंडेशन, सांगली , ता. मिरज जि. सांगली – आपण राहत असलेल्या समाजाशी आपली नाळ जोडलेली आहे, या समाजाचे आपण देणे लागतो या विचाराने स्वस्थ बसू न देता संवेदना फौंडेशन, सांगली यांनी सामाजिक कार्याची सुरुवात केली परंतु समाजातील वंचित, निराधार, बाल वृद्ध यांच्यासाठी काही महत्त्वपूर्ण करावे ह्या विचाराने संवेदना फौंडेशन, सांगली यांनी उपक्रम प्रज्वलीत केले. या उपक्रमातून १ मार्च २०१८ पासून शहरातील अपंग, वृद्ध, निराधार तसेच शारीरिक व्यंगामुळे स्वत चा उदर निर्वाह करता येत नाही अशा व्यक्तींचा शोध घेऊन त्यांना दररोज मोफत दोन वेळ पुरेसे अन्न एकावेळी घरपोहोच देण्याच्या उपक्रमाला सुरुवात केली.एखादी व्यक्ती निराधार व शारीरिक दृष्ट्या अकार्यक्षम आढळली कि तिची संपुर्ण माहिती घेतली जाते, शेजाऱ्यांच्याकडून खात्री केली जाते, संबंधित व्यक्तीची शारीरिक मानसिक स्थिती तपासली जाते. त्या व्यक्तीला इतर कोणाकडून आर्थिक सहकार्य मिळते का याचा शोध घेण्यात येतो आणि मगच जेवण चालू करण्यात येते. केवळ यावरच न थांबता त्यांना गरज आणि मागणी नुसार जीवनावश्यक वस्तू पोहोच केल्या जातात या मध्ये अगदी कपडे, चादर, जमखाना, चप्पल व इतर काही वस्तूचा समावेश आहे. त्याच प्रमाणे आरोग्य विषयक बाबींवर विचार करता याच निराधार व्यक्तींना १ मार्च २०१८ पासून मोफत औषधोपचार केले जातात.

How can you help us

Gallery

Videos

SUPPORT THESE PEOPLE